आ.गाडगीळानी केला सत्कार
प्रतिनिधी / सांगली
कोविड रुग्णाची सापडलेली ६ तोळ्याची सोन्याची चेन परत करणाऱ्या मिरजेतील मिशन हॉस्पिटलमधील आया शांभवी अमोल आवळे यांचा आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात सत्कार केला.
उपचारासाठी दाखल मालती मधुकर जोशी चिंताजनक झाल्याने त्यांना विशेष दक्षता विभागात हलवण्यात आले होते. धावपळीत जोशी यांनी ६ तोळेची चेन रिपोर्ट फाईलमध्ये राहीली. चार दिवसांनी खोलीची स्वच्छता करते वेळी ती आवळे यांना मिळाली त्यांनी प्रामाणिक पणे ती जोशीना परत केली व.आजही चांगुलपणा जीवंत आहे याचे दर्शन दिले.








