प्रतिनिधी / सांगली
नवभारत शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शांतिनिकेतन अभ्यास केंद्रामधील दोन विद्यार्थीनींनी विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या एम.ए. परीक्षेमध्ये महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला त्यासोबत महाराष्ट्र शासनाने प्रायोजिलेले दादासाहेब गायकवाड पारितोषिकही पटकावले.
विद्यापीठामार्फत 2019 मध्ये घेण्यात आलेल्या एम.ए. परीक्षेत लता संपत पवार यांनी महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावला, तर 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये प्राची भुपाल जबडे यांनी महाराष्ट्रात दुसरा क्रमांक व पारितोषिक पटकावले. विद्यापीठाचे विभागीय संचालक प्रा. दादासाहेब मोरे, शांतिनिकेतन अभ्यास केंद्रप्रमुख गौतम पाटील, केंद्र संयोजक प्रा. अरुण डी. शिंदे, सहाय्यक भूषण साळवी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व संमत्रकांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.