सांगली / प्रतिनिधी
सांगली शहरांमध्ये शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजल्या पासून वीज गायब झाली आहे. जोरदार वारे आणि विजांचा लखलखाट त्यातच सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ वीज पुरवठा खंडित झाल्याने सांगली शहर अंधारात बुडून गेले आहे. दरम्यान सांगलीच्या राजवाडा परिसरात झाडाच्या फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता.
Previous Articleविट्यात पोलिसाला दुचाकीमागे फरफटत नेले
Next Article केरळचे मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह








