सेल्फी पॉईंट, कारंजा, बोटिंग होणार सुरू
प्रतिनिधी / सांगली
सांगली शहरातील काळ्या खणीचे भाग्य उघडले आहे. सुशोभीकरनाच्या माध्यमातून खणीचे रूप पालटू लागले आहे. काही दिवसांपूर्वी कहाणी जवळ सेल्फी पॉईंट सुरू करण्यात आला आहे. विविध रंगांची उधळण करणारा कारंजा अन आता खणीमध्ये बोटिंगही सुरू करण्यात येणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींच्या बरोबर नागरिकांचेही चांगले सहकार्य मिळत असल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
कापडणीस म्हणाले, काळी खण सुशोभीकरण अंतर्गत उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटला जनतेचा प्रतिसाद मिळत हे. रंगीबेरंगी कारंजाही सुरू करण्यात आला आहे. सांगलीच्या मध्यवर्ती असणाऱ्या काळ्या खणीत सुशोभीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षोपासून रखडलेले होते. या खणीचे शुभिकरणाबाबत तातडीने पाऊले उचलण्यात आली. पहिल्या टप्प्यात काळ्या खणीतील कचरा बाजूला केला जात आहे. सेल्फी पॉइंटवर नागरिक काळ्या खणीचे सौन्दर्य पाहण्यासाठी येत आहेत. काळ्या खणीला कंपाउंड नसल्याने तिथे अपघाताची शक्यता होती.
त्यामुळे तातडीने पश्चिम बाजूच्या मुख्य रस्त्या लागत तारेचे कंपाउंड उभारण्यात आले. यामुळे कोणतेही दुर्घटना होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. आता सांगलीकर जनतेच्या मागणीनुसार लवकरच काळी खण सुशोभीकरण अंतर्गत बोटिंगची सुविधा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे काळ्या खणीमध्ये नागरिक जल पर्यटन करू शकतील असे नियोजन सुरू आहे.
याचबरोबर संपूर्ण खणीच्या चोहोबाजुनी आकर्षक विद्युत व्यवस्था सुद्धा करण्याचे नियोजन आहे. काळी खण रोषणाईने उजळून निघेल आणि यामुळे हे एक सांगलीतील चांगले पर्यटन स्थळ म्हणून समोर येईल. याचबरोबर सेल्फी पॉईंटजवळ आणि बोटिंग पॉईंटजवळ खाऊ गल्ली करण्याचे नियोजन सुद्धा सुरू आहे.








