देशातील सर्वोत्कृष्ठ तपासासाठी हा पुरस्कार दिला जातो
वाई येथे कोणताही पुरावा नसताना चार खुनांचा उलगडा केला होता
प्रतिनिधी / सांगली :
देशातील सर्वोत्कृष्ठ तपासासाठी देण्यात येणारे प्रतिष्ठेचे केंद्रीय गृहमंत्री पदक सांगली शहरचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांना जाहिर झाले आहे. अजित टिके हे वाई येथे कार्यरत असताना त्यांनी कोणताही पुरावा नसताना चार खूनाचा उलगडा केला होता. या तपासासाठी त्यांना हे पदक जाहिर झाले आहे. देशातील 152 पोलीस अधिकाऱयांना हे पदक जाहिर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 अधिकाऱयांचा समावेश आहे.
अजित टिके हे वाई येथे कार्यरत असताना त्यांना एका घाटात एक पुर्णपणे कुजलेला मृतदेह आढळून आला होता. त्याठिकाणी कोणताही पुरावा नव्हता. फक्त एक चिठ्ठी आढळून आली होती. त्या चिठ्ठीवरून त्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर या तपासाला गती आल्यावर एकूण चार खुनांची मालिका उघडकीस आली. यामध्ये आई-वडिल आणि दोन मुलांचा समावेश होता. होमगार्डमध्ये नोकरी लावतो म्हणून या दोन मुलांचा खून संशयितांने केला होता. त्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांनाही या संशयितांने मारून टाकून या सर्वांचे मृतदेह वाई परिसरातील दरीत टाकून दिले होते. या खूनाच्या तपासासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. हे चारही खून सांगली जिल्हÎातील कुपवाड येथील कुंटुंबांचे होते. या तपासात त्यांना त्यांच्या पथकाचेही मोठे सहकार्य मिळाले होते. या तपासासाठीच सर्वोत्कृष्ठ केंद्रीय गृहमंत्री पदक त्यांना जाहिर झाले आहे. लवकरच या पदकाचे वितरण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील या पोलीस अधिकाऱयांनाही पदक जाहिर
पोलीस निरीक्षक ममता डिसूझा, एसीपी श्रीमती पद्मजा भदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका जाधव, एसीपी श्रीमती प्रिती टिपरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल बाहुरे, पोलीस निरिक्षक मनोहर पाटील, पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी, पोलीस निरीक्षक सुनील शिंदे, पोलीस अधिक्षक सुनील काडणे, उपअधीक्षक उमेश माने पाटील यांचा समावेश आहे.









