आत्महत्याग्रस्त महिलेच्या आईची खून केल्याची तक्रार, प्रेत ताब्यात घेण्यास नकार
निलंगा / प्रतिनिधी
कवठाळ येथील विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव सासरच्या लोकांनी केला असून, गळा आवळून सासरच्या मंडळींने ठार केला. आहे अशी तक्रार मयत मुलीच्या आईने देवणी पोलिस ठाण्यात देण्यासाठी गेल्या असता उत्तरिय तपासणी झाल्याशिवाय गुन्हा दाखल केला जाणार नाही. म्हणत पोलिस दडपण टाकत आहेत. गुन्हा दाखल केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असा माहेरच्या लोकांनी पविञा घेतला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, देवणी तालुक्यातील कवठाळ येथील भाग्यश्री लक्ष्मण हाणमंते (वय २३ वर्षे) या विवाहित महिलेने गळफास घैऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला असून तीची सासू, सासरा,पती व ननंद या चौघांनी गळा दाबून खून केला असल्याची तक्रार देवणी पोलिस ठाण्यात मयत मुलीची आई नागीनबाई गंगाधर कांबळे राहणार शिऊर ता.निलंगा यांनी दिली आहे.
काल बैलपोळ्याच्या ऐन सणादिवशी दुपारी ठीक ३.३० वाजता घरात सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची आरडाओरडा झाला. प्रत्यक्षदर्शी पहाता तसे प्रेत गळफास घेतले नव्हते. असा आरोप मयताच्या आईने केला आहे. विवाहित मुलगी भाग्यश्रीला गळा दाबून तीचा पती लक्ष्मण वसंत हाणमंते, सासु अरुणा वसंत हाणमंते, सासरा वसंत हाणमंते, ननंद शितल कांबळे या चौघांनी संगनमताने गळा आवळून ठार केले आहे. आणि गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खोटा बनाव केला असून या चौघांना आटक करून मला न्याय द्यावा. अशी तक्रार मयत विवाहितेच्या आईने देवणी पोलिस ठाण्यात दिली आहे. मयत विवाहित महिलेला दोन लहान मुले आहेत. गुन्हा दाखल केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही. असा पविञा माहेरच्या लोकांनी घेतला आहे.
याबाबत वलांडी पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक पंकज शृंगारे यांना संपर्क साधला असता सदरील मयत महिलेचे शवविच्छेदन झाले नसून प्रेताच्या शरीराची उत्तरीय तपासणी झाल्यानंतरच संपूर्ण खरी माहिती पुढे येईल. सासरच्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मयत विवाहितेच्या आईने पोलिस ठाण्यात सासरच्या चौघाविरूध्द तक्रार दाखल केली आहे. तपासानंतर गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती त्यानी दिली.