प्रतिनिधी / सांगली
विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांच्यावर कारवाईचा बडगा उगरण्यात येत आहे. बुधवारी दिवसभरात ४८ नागरिकांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून कारवाई सुरू आहे.
मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे व प्रभाग समिती १ चे सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. सांगलीच्या राजवाडा चौकात वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, वैभव कुदळे, किशोर कांबळे, प्रणिल माने यांच्यासह प्रभाग समिती १ चे कर्मचारी यांनी विनामास्क वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली.
यामध्ये ४८ व्यक्तींवर मास्क न वापरल्या बदल दंडात्मक कारवाई करत ६२०० इतका दंड वसूल केला. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्वानी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स पाळावा आणि सॅनिटायझरचा वापर करा असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.








