प्रतिनिधी / सांगली
काही तरुण मंडळे नदी पात्रात आपल्या खासगी बोटी घेऊन विनाकारण फिरताना दिसत आहेत त्यामुळे यापुढे महापालिकेच्या परवानगी शिवाय कोणीही खासगी बोट नदी पात्रात आणल्यास त्या बोटी जप्त केल्या जातील असा इशारा आयुक्त कापडणीस यांनी दिला.
तसेच नदीपात्रात पाणी पाहण्यासाठी नागरिक विनाकारण नदीकाठावर गर्दी करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी नदी काठावर किंवा घाटावर गर्दी करू नये असे आवाहनही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. तसेच आयर्विन पुलावरून पात्रात उड्या मारताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.