निकालाला विलंब होणार, उत्सुकता शिगेला
अभूतपूर्व विक्रमी मतदान,कुणाचा फायदा ?
प्रतिनिधी / सांगली
विधानपरिषद पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मंगळवारी चुरशीने मतदान झाले व उद्या गुरवारी पुणे बालेवाडी येथे सकाळी आठ पासून मतमोजणी सुरु होते आहे. पदवीधरसाठी सुमारे 50.08 तर शिक्षक साठी 70.44 टक्के मतदान नोंदले गेले आहे गत निवडणूक तूलनेने ते आधिक व अभूतपूर्व आहे, टोकाचा प्रचार आणि पदवीधर साठी 62 तर शिक्षकसाठी 35 अशी प्रचंड उमेदवार संख्या यामूळे मतदान वाढले आहे.
हे वाढीव मतदान आपल्या पदरात पडले असल्याचा दावा प्रमुख स्पर्धक करत आहेत पदवीधरसाठी भाजपमहायुतीचे संग्रामसिंह देशमुख व राष्ट्रवादी महाआघाडीचे अरुण लाड याच्यात तर शिक्षकसाठी महायुतीचे जितेंद्र पवार व महाआघाडीचे जयंत आसगावकर यांच्यात लढत आहे. दोन्ही मतदारसंघात अन्य काही तगडे उमेदवार आहेत. ओघानेच चूरस आणि दोन नंबरची पंसतीमते कोण पदरात पाडून घेतो याला महत्व आहे.
उमेदवार प्रचंड संख्या आणि पंसतीक्रमानुसार मतदान असल्याने निकाल गुरवारी रात्री उशीरा किंवा शुक्रवारी येईल असे अंदाज आहेत पण कल स्पष्ट होतील. मतमोजणीसाठी सरकारी व उमेदवार यंत्रणा सज्ज झाली आहे.








