प्रतिनिधी/शिराळा
पाडळी ता. शिराळा येथे नदीवरील विद्युत मोटार दुरूस्ती करताना विजेचा धक्का लागून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मानसिंग बबन पाटील (वय २८) आणि विक्रम उर्फ जयकर सर्जेराव पाटील ( वय 32 ) अशी या दोघा मृत युवकांची नावे आहेत. हे दोघे मोटार सुरू होत नसल्याने ती दुरूस्ती करण्यासाठी गेले होते. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. दोघे सख्खे चुलत भाऊ असून एक अविवाहित होता.
आज सकाळी सात वाजता पाडळी येथील मोरणा जलाशयाजवळ मानसिंग आणि विक्रम हे विद्युत मोटार सुरू होत नसल्याने पाहण्यासाठी गेले होते. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पाडळी गावावर शोककळा पसरली .
Previous Articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार
Next Article दिवडमध्ये शंभर टक्के लॉकडाऊन








