प्रतिनिधी / इस्लामपूर
प्रशासकीय अधिकाऱ्यांपाठोपाठ शनिवारी कोरोनाने राजकीय व्यक्तींकडे मोर्चा वळवला.उपनगराध्यक्ष यांच्यासह विद्यमान व माजी नगरसेवक यांच्या पत्नी,बहे च्या उपसरपंच,त्यांचे पती,मुले यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच तीन व्यक्तींचा मृत्यू झाला.शनिवारी तालुक्यात २१ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यामुळे शहर व वाळवा तालुक्यात भीती अधिकच वाढली आहे.
गेल्या काही दिवसांत तालुक्यातील ग्रामीण भागात रुग्ण अधिक सापडत होते. तर शहरात दिलासा मिळाला होता. पण या आठवड्यात कोरोनाने शहरात हात-पाय पसरले आहेत.गेल्या दोन दिवसांत काही प्रशासकीय अधिकारी यांना कोरोनाची बाधा झाली. दरम्यान कोरोनाचा मोर्चा राजकीय लोकांकडे वळला आहे. गेल्या दोन दिवसांपासून उपनगराध्यक्ष यांची चर्चा सुरु होती.त्यांची चाचणी घेण्यात आली होती. शनिवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बहेच्या उपसरपंच यांच्यासह त्यांचे पती व मुले यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. तर शहरातील मध्य वस्तीमधील विद्यमान व माजी नगरसेवक यांच्या पत्नींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे राजकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या शिवाय शहर व ग्रामीण भागात रुग्ण वाढले आहेत.
शनिवारी वाळवा येथील ७०वर्षीय महिला,बहे येथील ७७ व वाघवाडी येथील ६० वर्षीय पुरुषांचा मृत्यू झाला.गाववार पॉझिटिव्ह रुग्ण असे, इस्लामपूर-९,रेठरेधरण,साखराळे प्रत्येकी-२,कोरेगाव,जुनेखेड,बागणी, कासेगाव,भडकंबे, मसुचीवाडी, गोटखिंडी,नेर्ले येथील प्रत्येकी एक व्यक्ती बाधित झाली आहे. रविवारपासून प्रशासनाने शहरात तीन दिवसांचा लॉकडावून घोषित केला आहे.त्यामुळे सोशल डिस्टनसिंगचे पालन होईल,अशीअपेक्षा आहे.
Previous Articleसांगली जिल्हय़ात 18 जणांचा मृत्यू ,289 रूग्ण वाढले
Next Article धक्कादायक : कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासात 28 बळी








