सावळज/ वार्ताहर
वायफळे ता.तासगाव येथे सततच्या पावसामुळे जमिन खचल्याने ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरालगत असलेले सरनोबत मंदिर कोसळले. या मंदिराच्या पायाखाली असलेली दगड मातीची भिंत सततच्या पावसामुळे पूर्णतः खचली होती. ही भिंत ढासळल्याने हे मंदीर कळसासह एका राहत्या घराची संरक्षक भिंत व पत्र्याचे शेडवर पडले. यात मंदिरांच्या कळसाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. मात्र मंदिर पडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
वायफळेसह परीसरात गेली काही दिवस रिमझिम पाऊस पडत आहे. या सततच्या पावसामुळे मंदीर परिसरातील जमीन खचून मंदिराला धोका निर्माण झाला होता. रविवारी सकाळी आणखीच मंदीरा खालील जमीन खचल्याने हे मंदिर पुर्णपणे कोसळले. वायफळे येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर या मंदिराच्या लगत सरनोबत या देवाचे छोटेखानी मंदिर सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी लोकसहभागातून बांधण्यात आले होते. चैत्री पौर्णिमेला याची ही यात्रा भरते. हे मंदिर आज सकाळी भिंत खचल्याने शिखरासह उन्मळून पडले. हे मंदिर पडताना अनेक नागरिकांनी पाहिले. व सकाळी हे मंदिर पडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला त्यानंतर बघ्यांनी व ग्रामस्थांनी मंदिराकडे पाहण्यासाठी एकच गर्दी केली.
या मंदिर लगत असणाऱ्या एका राहत्या घराच्या संरक्षक भिंत व लगत असणाऱ्या पत्र्याच्या शेडवर पडले. यात या घराचीही पडझड झाल्याचे समजते. या घरातील साहित्य पाण्याची टाकी सकाळी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन बाजूला केली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








