प्रतिनिधी / मिरज
वाढीव वीज बिलाच्या विरोधात आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. लक्ष्मी मार्केट चौकात झालेल्या या आंदोलनात आम आदमीच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी भाग घेतला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत वीज महावितरणने सर्वसामान्य नागरिकांना वाढीव बिलांचा शॉक दिला आहे. सदर बिले माफ करावीत, यासाठी आम आदमीनीने अनेकवेळा आंदोलने केली. एकीकडे आघाडी शासन केवळ आश्वासनांचा पाऊस पाडत आहे. तर दुसरीकडे सक्तीने वीज बिलांची वसुली सुरू आहे. या वीज बिलांना आम आदमीचा विरोध आहे. निद्रिस्त सरकारला जाग आणण्यासाठी आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद केला. नागरिकांची सरसकट वीज बिले माफ करावीत, अशी मागणी करण्यात आली.








