प्रतिनिधी/इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील वाघवाडी येथील बॉम्बे रेयॉनच्या पाठीमागील पेठ जांभुळवाडी रस्त्यावर मित्रानेच मित्राचा पाठलाग करुन धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण खून केला. अभिजीत हरी शेलार (वय-२२, रा. जांभुळवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान त्याने सपासप दहा ते बारा वार केले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. खून करून आरोपी राजेंद्र मारूती बांदल (-२५, रा.जांभूळवाडी) हा इस्लामपूर पोलीस ठाण्यात हजर झाला. हा खून प्रेम प्ररकणातून झाल्याच कबुली आरोपी बांदल याने पोलीसांसमोर दिली.
अभिजीत व बांदल हे अगदी जवळचे मित्र आहेत. दोघेही अविवाहित असून सेंट्रीग कामा बरोबरच मोलमजूरी करीत होते. मृत अभिजीत हा सध्या एस.वाय.बीए मध्ये शिकत होता. बुधवारी सकाळ पासूनन हे दोघे एका मोटार सायकलवरून फिरत होते. ही घटना घडण्यापुर्वी ते इस्लामपुरातून तिकडे पोहचल्याचे समजते. मृत अभिजीत याचे पूर्वी एका मुलीबरोबर प्रेम संबंध होते. हे संबंध विस्कळीत झाल्यानंतर आरोपी बांदल याचे तिच्याशी सूत जुळले. यावरून या दोघात अधूनमधून वादावादी होत होती. प्रेमाच्या आड येत असल्याच्या रागातूनन बादल याने शेलार याचा कायमचा काटा काठला. बॉम्बे रेयॉनचे पाठीमागील शिवार अत्यंत निर्जन असून बुधवारी दोघे एकत्र असतानाच या प्रेम प्रकरणातूनच दोघात खटका उडाला. रागाने बेभान झालेल्या बांदल याने काही अंतर पाठलाग करुन धारदार शस्त्राने शेलारचा गळा चिरला.
Previous Articleसातवा वेतनसाठी चारही कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन
Next Article नाथाभाऊंनी मला व्हिलन ठरवले : देवेंद्र फडणवीस








