वार्ताहर / वसगडे
पलूस तालुक्यातील वसगडे येथील नदीवर असणाऱ्या पुलाचा नांद्रेकडील बाजूचा भराव ढासळुन पश्चिमेकडील बाजू खचून गेल्याने पुलाचा परिसर धोकादायक बनला आहे. नांद्रेकडील बाजूच्या रस्त्याला गोलाई असुन झाडे झुडपे वाढल्याने या खचलेल्या भागाचा अंदाज वाहनचालकांना येत नसून अवजड वाहन गेल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्काळ पुलाची दुरुस्ती करावी. अन्यथा सुरक्षित उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत वाहनधारका मधुन होत आहे.
पलूस, भिलवडी परिसरातुन कामानिमित्त सांगलीला जाणाऱ्यांची संख्या जास्त अाहे तसेच सध्या ऊस हंगाम सुरु असुन मोठ्या प्रमाणात ट्रक्टर,अंगद मधुन ऊस वाहतुक सुरु आहे. साधारणतः दोन फुट डांबरी रस्ता खचला आहे. आक्टाेबर महिन्यात वसगडे बंधारा जवळील रेल्वे पुलाचा भराव वाहुन गेल्याने रेल्वेचे दहा कोटीच्या आसपास नुकसान झाले होते. पुलाचा भराव करुन तात्काळ दुरुस्तीची मागणी शांताराम कोकाटे यांनी केली आहे.








