वसगडे / वार्ताहर
पलूस तालुक्यातील वसगडे येथील मुस्लिम समाज कब्रस्तान मध्ये बकरीद ईद दिवशीच मुस्लिम रितीरिवाजा प्रमाणे माती सावरुन चुन्याचे पाणी टाकुन, दोन्ही बाजूला दगड, उदबत्ती लावून साफ सफाई करुन नवीन एक कबर सजविल्याची दिसुन आली. त्यामुळे गावात खळबळ माजली आहे.
या घटनेनंतर समाजामध्ये त्या कबरी विषयीची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असता गावात अलीकडच्या आठ दिवसात मुस्लिम समाजात कोणी मयत झाले नसून ती अज्ञात कबर गावातील कुणाची हे गूढ निर्माण झाले. ती कबर कोणाची ? असा सवाल उपस्थित झाल्याने कोविड-१९ संसर्गा च्या भितीने अथवा अंधश्रद्धेतून काही अघोरी प्रकार नारळी पौर्णिमेच्या उंबरठ्यावर घडला असावा या सशंयाने प्रचंड चर्चा सुरु झाली. अखेर पोलीस पाटील शशिकांत शिंदे, सरंपच श्रेणीक पाटील, ग्रा.पं.सदस्य लियाकत लांडगे यांनी सदरची माहिती भिलवडी पाेलिस स्टेशनला कळविली. थोड्याच वेळात भिलवडी पो.स्टेशनचे ए.पी.आय. कैलास कोडग दाखल झाले. या घटनेची कल्पना वरिष्ठांबरोबर इतर शासकीय यंत्रेणेला दिली गेली. काही वेळातच तहसिलदार राजेंद्र पोळ, भिलवडी आरोग्य केंद्राचे डॉ. वाय.ए. धेंडे, सांगलीची फॉरेन्सिक टीम घटनास्थळावर दाखल झाली.
सर्व शासकिय सोपस्कार पार पडले नंतर कबर खोदण्याचा निर्णय घेणेत आला. मात्र कबर खोदली असता त्यामध्ये काहीच संशयास्पद आढळून आले नाही. रिकामी कबर पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. मात्र सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास घेतला. आता ही कबर मुजविण्यात आली आहे. झाला प्रकार खोडसाळपणातून झाला असावा असे घटना स्थळावरील दृष्यावरुन दिसून येत होते. मात्र ऐन बकरी ईदच्या पूर्व संधेला ती कबर कोणी सवारली ? यांचे गूढ अद्याप कायम राहिल आहे.
Previous Articleशिरोळ पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव
Next Article कोल्हापूर : नेर्ली येथे तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू








