प्रतिनिधी / सांगली
विविध मागण्यांसाठी सांगली मार्केट यार्ड येथे हमालांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. आज दि. ११ नोव्हेंबर रोजी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे वसंत मार्केट यार्ड सांगली चे कार्यक्षेत्रातील संतगोळ ट्रेडिंग कंपनी या अडत व्यापारी फर्म ने खरेदीदार गुळ व्यापाऱ्यांची आणि बाजार समितीची दिशाभूल करुन सांगलीच्या व्यापारी लायसन्सवर कर्नाटकमध्ये परस्पर व्यापार सुरु केल्याने. सांगलीच्या गुळ बाजारास वेगळेच वळण लावण्यात आले आहे.
यामुळे अनलोडींग वारणी हमाल, अडतीचा हमाल, तोलाईदार, खरेदीदार हमाल, लोडींग वारणी हमाल हे सर्व घटक बेकारीच्या मार्गावर आहेत. याबाबत गेले दिड वर्षे सांगली बाजार समितीला निवेदने दिली. आंदोलन केले. बैठकीमध्ये यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावर हि चर्चा केल्या. परंतु बाजार समितीने ठोस कार्यवाही न करता बघ्याची भुमिका घेतल्याने आज हमाल तोलाईदार यांचा असंतोष उफाळून येवुन हमाल तोलाईदार यांनी सकाळ पासुन काम बंद आंदोलन करुन बाजार समिती कार्यालया समोर ठीय्या आंदोलन केले. त्यास ईतर विभागातील हमालांनी तीन तास काम बंद ठेवुन पांठीबा देवुन, हमाल तोलाईदार यांनी मार्केट यार्ड मध्ये निषेध फेरी काढली.
संबधीत अडत फर्मवर कारवाई करण्यात यावी आणि यापुर्वी हमाल तोलाईदार यांनी दिलेल्या निवेदना नुसार तसेच सुचविलेल्या उपाययोजनाची अंमलबजावणी करण्याची मागणी बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांचे कडे आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच सदर अडत फर्म वर हमाल तोलाईदार यांनी बहिष्कार टाकून सदर फर्मचे हमाली तोलाईचे कामकाज नाकरण्याचा निर्णय घेतला.