प्रतिनिधी/सांगली
बुधगाव (ता. मिरज) येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या “ऑटोमॅटिक पीनट शेलिंग मशीन” या यंत्रास इंडियन पेटंट्स कार्यालयाकडून मान्यता मिळाली आहे. अध्यक्ष विशाल पाटील, विश्वस्त अमित पाटील यांच्या प्रेरणेने महाविद्यालयात इनोव्हेशन सेल चालू आहे. त्या अंतर्गत संशोधन कार्याची घोडदौड वेगाने चालू आहे. या यंत्राची संकल्पना गव्हर्निंग कौन्सिल सदस्य प्रा. पंकज आवटे यांनी मांडली.
आतापर्यंत कोणत्याही संशोधकाने अशाप्रकारचे यंत्र बनविले नसून हे अशाप्रकारचे पहिलेच यंत्र आहे. ज्यामुळे शेलिंगसाठी लागणार वेळ कमी होऊन शेलिंगची उत्पादकता सुधारण्यास मदत होणार आहे. या यंत्रामुळे वेळेची बचत होणार आहे. सोबतच हे यंत्र हाताळण्यास अत्यंत सुलभ असे आहे. विशेषतः महिला व वृद्ध व्यक्तींचे काम कमी करण्याबरोबरच उच्च कार्यक्षमता व उच्च उत्पादनक्षमता हे या यंत्राचे वैशिष्ट आहे.
या डिझाईनला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाइन पेटंट मान्यता प्राप्त झाली आहे. याचा उपयोग व्यावसायिक व व्यापारी पद्धतीने करता येतो. हे यंत्र बनविण्यासाठी पी.ल. राजपूत, आदिनाथ मगदूम, प्रा. डॉ. डी. व्ही. घेवडे, डॉ. एन. एम. ढवळे, सी. जी. हारगे आदींचे मार्गदर्शन लाभले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








