जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची माहिती
प्रतिनिधी / सांगली
जिल्हा नियोजन समितीमधून १ कोटी ३२ लाख रुपयाचा निधी खर्चून उभारण्यात आलेल्या पद्मभुषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, (सिव्हील हॉस्पिटल) सांगली येथील लिक्वीड ऑक्सिजन प्लँट सुरु झाला आहे. सदर ऑक्सिजन प्लँटची साठवण क्षमता १३ K.L. असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी निर्देश दिले होते.सोमवारी या लिक्वीड ऑक्सिजन प्लँटचे फजींग करुन कुलींग करण्यात आले. या टँकमध्ये अंदाजे १२ मे.टन लिक्वीड ऑक्सिजन भरण्यात आला आहे. सिव्हील हॉस्पिटल सांगलीसाठी प्रतिदिन अर्धा ते एक मे.टन इतकी रुग्णांच्या गरजेनुसार ऑक्सिजनची आवश्यता असते. त्यानुसार एकदा लिक्वीड ऑक्सिजन टँक पूर्ण क्षमतेने भरल्यास सिव्हील हॉस्पिटलला अंदाजे १७ ते १८ दिवस ऑक्सिजन पुरेल असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.








