प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्हा मराठी अध्यापक संघाचे वतीने लेखक-कवी, गिर्यारोहक “आपल्या भेटीला” या सदरामध्ये इयत्ता 10 वी च्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट असणारे लेखकांशी झूम अॅपच्या माध्यमातून आंतरजालावर संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये रविवार 26 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता “गोष्ट जिद्दी अरूनिमाची” या पाठाच्या लेखिका व पत्रकार सुप्रिया खोत, याच दिवशी सायंकाळी 5:30 वाजता दिव्यांगावर मात करणारा साहसी गिर्यारोहक, पॅराग्लायडर अशोक मुन्ने आपले अनुभवकथन करणार आहेत. यांच्याशी विठ्ठल मोहिते हे संवाद साधतील. सोमवार 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता झी मराठी वाहिनीवरून ‘चला हवा येवूद्या’ मालिकेतील “पत्रास कारण की.” या स्कीटचे लेखक व पाठ्यपुस्तकातील ‘आप्पाचे पत्र’ याचे पत्रलेखक,गीतकार अरविंद जगताप भेटीला येताहेत. मंगळवार 28 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता तू “झालास मूक समाजाला नायक” याचे कवी ज.वि. पवार आपल्याशी बोलतील. तर बुधवार 29 रोजी दुपारी 4:30 वाजता “खोद आणखी थोडेसे” याच्या कवयित्री असावरी काकडे शिक्षकांच्या भेटीस येताहेत.
यापूर्वी या मालेत लेखक महेंद्र कदम, डॉ.सुनिल विभुते, कवी वीरा राठोड, डॉ. निलीमा गुंडी, डॉ. सुजाता महाजन हेही सहभागी झाले आहेत. यासाठी शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग, नामदेव माळी, मारूती लिगाडे, माधुरी गुरव यांचे मार्गदर्शन लाभते आहे. या उपक्रमासाठी अध्यक्ष-विठ्ठल मोहिते, कार्याध्यक्ष बजरंग संकपाळ, संकल्पक वैशाली आडमुठे, नाना पवार, संजय पाटील हे प्रयत्नशील आहेत. या उपक्रमाचा लाभ मराठीच्या शिक्षकांनी घ्यावा,असे अवाहन विठ्ठल मोहिते यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








