कोयनेतून 50 हजार क्युसेस विसर्ग दहा वाजाता सुरु
कृष्णा ,वारणा पाणी पातळी वाढणार सांगलीत 50 फूटावर पाणी पातळीचा अंदाज
प्रतिनिधी / सांगली
कोयना व वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु आहे या पाश्वभूमीवर महाराष्ट्र व कर्नाटक समन्वयाने व सुसंवादाने पाणी विसर्ग व्यवस्थापन हाताळत असून शुक्रवारी सकाळी सात पासून अलमट्टी मधून 1लक्ष.70 हजार क्युसेस विसर्ग सुरु आहे. आणखी थोडा वेळानी 10 वाजता तो वाढवून 2 लक्ष करण्यात येणार आहे तर कोयनेतून सकाळी 10 वाजता 50 हजार क्युसेस विसर्ग करणार अशी घोषणा आहे.
नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढते आहे. सांगलीत कृष्णा पातळी 50 गाठणार असा इशारा आहे. महापूराची स्थिती निर्माण झाली आहे या पाश्वमूमीवर प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे
Previous Articleकोल्हापूर जिल्हय़ात पावसाचा कहर
Next Article निपाणी-चिकोडीतील सात बंधारे पाण्याखाली









