पुन्हा लसीकरण सुरू होणार; डॉ. मिलिंद पोरे
प्रतिनिधी / सांगली
अखेर तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी सकाळी कोरोनाचे ६६ हजार डोस मिळाले. याचे तातडीने वाटप करण्यात आले. एका केंद्राला १ ते दीड हजार प्रमाणे लस देण्यात आले असून यामुळे सर्व म्हणजेच २२६ केंद्रात नियमित लसीकरण सुरू झाले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी दिली.
आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे म्हणाले, शासनाकडे दोन लक्ष लसीची मागणी केली होती. मात्र शनिवारी ६६ हजार डोस उपलब्ध झाले. दिवसाला किमान १५ ते २० हजार डोसची गरज आहे. आलेले डोस चार दिवस पुरेल असेही डॉ. पोरे यांनी सांगितले.