कृष्णाकाठ उद्योगसमुहाचे संस्थापक जे. के. बापू यांनी भिलवडी ते कुंडल, दूधोंडी पूल दरम्यान कामांची केली पाहणी
वार्ताहर/कुंडल
रेल्वेच्या विद्युतीकरण व दुहेरीकरणाचे काम मिरज ते सातारा मार्गावर सुरू असून रेल्वेच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणामुळे कुंडलसह, संपूर्ण पलूस तालुक्याचे दळणवळणात वाढ होऊन शेतीमाल, व्यापारासह शैक्षणिक क्षेत्रासाठी फायदेशीर होणार आहे. मात्र सद्या दुहेरीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा रस्त्यासह, पावसाळ्यातील पाण्याच्या निचऱ्याच्या प्रश्नासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याकडे कोणीही लक्ष देत नव्हते मात्र, कृष्णाकाठ उद्योगसमुहाचे संस्थापक जे. के. बापू यांनी भिलवडी ते कुंडल, दूधोंडी पूल दरम्यान या कामाची पाहणी केली.
कोणताही अन कसलाही प्रश्न असो तेथे कृष्णाकाठ उद्योगसमुहाचे संस्थापक जे. के. बापू जाधव हे प्रश्न सोडवण्यासाठी सतत अग्रभागी असतात. सद्या सुरु असलेल्या रेल्वेच्या दुहेरीकरणामुळे अनेक ठिकाणी शेतीसाठीच्या रस्त्याचे प्रश्न निर्माण झाल्याने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांसमवेत शेतकऱ्यांचे रस्त्याचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी जे. के. बापू यांनी भिलवडी ते कुंडल, दूधोंडी पूल या दरम्यान अनेक कामांची पाहणी करुन निर्माण झालेल्या समस्यांची मांडणी अधिकार्यांकडे करुन त्या सोडविण्याची मागणी केली . त्यांच्यासोबत रेल्वेचे जिवनकुमार बिल, दिपककुमार आदी अधिकारी होते.
“बापू” ताकारी- येळावी रस्त्याकडे लक्ष द्या…
विजापूर- गुहागर महामार्गावरील ताकारी- येळावी फाटा दरम्यान च्या रस्त्याचे काम रखडले असून याचा त्रास वाहन धारकांना होत आहे. याकडे कोणीही लक्ष देत नाही. अन या टप्प्याचे काम काँक्रीट चे न करता डांबरीकरण करुन पुर्ण करणेचा घाट घातला जात असून यामुळे वारंवार रस्त्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने हा रस्ता लवकरात लवकर अन तोही काँक्रीटचाच व्हावा यासाठी जे.के.बापूंनीच लक्ष घालावे अशी मागणी तेथील नागरीकांतून होत आहे.