आटपाडी / प्रतिनिधी
वडिलांच्या नावे असलेली मिळकतीची नोंद रद्द का केली म्हणून राजेवाडीचे ग्रामसेवक दत्तात्रय गळवे यांना तेथील अॅडवोकेट सचीन सातपुते यांनी फोनवरून दप्तर जाळणे व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत ग्रामसेवक दत्तात्रय गळवे यांनी आटपाडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.