प्रतिनिधी / सांगली
सांगलीच्या गजबजेल्या राजवाडा चौकातील सर्कल भोवती लावण्यात आलेल्या लोखंडी खांबाला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने हा लोखंडी कोसळला. काही दिवसापूर्वी अशाच एका वाहनाच्या धडकेत या सर्कल भोवतालचा लोखंडी खांब तुटला होता.
राजवाडा चौकातील सर्कल भोवती लावण्यात आलेले लोखंडी खांब वाहनांना अडथळे होत असून यामुळे येथे छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे महापालिकेने सर्कल भोवती लावलेले लोखंडी खांब त्वरित काढून टाकावेत असे वाहन धार कातून मागणी होत आहे.








