सांगली \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सांगली जिल्ह्यातील भिलवडीत पूरस्थितीचा आढावा घेतला.अवघ्या 5 ते 7 मिनिटांत मुख्यमंत्र्यांनी हा दौरा आटोपला. पूरग्रस्त नागरिकांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला आहे. सांगलीच्या भिलवडी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधून भिलवडीमधील नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही, सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन दिलं आहे. तसेच या संकटातून मार्ग काढणारच, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या भिलवडी येथे नागरिकांशी संवाद साधला यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, कोरोनाचं सकट अजूनही कायम आहे. त्या संकटाचा विचार केला तर अशी गर्दी करुन काही उपयोग नाही. सगळ्या तुमच्या वेदना आमच्यापर्यंत पोहचल्या आहेत. ज्यावेळी संकट कोसळणार असा अंदाज आला तेव्हापासून सरकार कामाला लागले, जिथे जिथे शक्य तेथिल नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले या पट्ट्यात ४ लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले. कोणतीही जिवितहानी होऊ नये हाच प्राधान्यक्रम होता आणि तो राहणार आहे. तो साधत असताना घरे सोडून जावे लागले हा आनंदाचा मुद्दा नाही.
भिलवडीमधील नागरिकांना वाऱ्यावर सोडणार नाही, सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. तसेच काही कठोर निर्णय घ्यावे लागतील मात्र त्याला तुमची तयारी असली पाहिजे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








