कुपवाड / प्रतिनिधी
मुलाच्या अकरावीच्या प्रवेशासासाठी पत्नीने पैसे मागितल्याच्या कारणावरुन चिडून पतीने रिव्हाॅलवरचा धाक दाखवून पत्नीला शिविगाळ केल्याचा प्रकार कुपवाडमधील अकूज ड्रीमलँडमध्ये बुधवारी रात्री घडला.
याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांनी पती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संशयित तानाजी शिवाजी पवार (रा.अकुज ड्रिमलॅण्ड, कुपवाड) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. सौ.कविता तानाजी पवार यांनी फिर्याद दिली आहे. पतीने रिव्हॉलवरचा धाक दाखवून शिवीगाळ केल्याने पोलिसांनी पवार यांना ४१(१)प्रमाणे नोटीस देऊन त्याच्या जवळील गुह्यात वापरलेली रिव्हॉलवर जप्त केली आहे.








