गुगल पेद्वारे पैसे हडपले, पालकांची फसवणूक
प्रतिनिधी/मिरज
मुलाच्या शिक्षणासाठी जस्ट डायल या वेबसाईटवरील मोबाईल क्रमांकावरुन शिक्षण कर्ज मागितले असता, त्यापोटी आगाऊ 64 हजार, 250 रुपये भरुन घेऊन फसवणूक केल्याची तक्रार विश्वास बाबुराव खांडेकर (वय 49, रा. आशा रेसिडेन्सी, मिरज) यांनी शहर पोलिसात दिली आहे.
खांडेकर यांनी आठ नोव्हेंबर रोजी मुलाच्या शिक्षणासाठी जस्ट डायल वेबसाईटवर मुलाच्या शिक्षण कर्जासाठी अर्ज केला होता. संबंधीत कर्ज देणाऱ्या कंपनीने त्यांना कर्ज मंजूर होण्यासाठी त्यासाठी प्रोसेसिंग फी भरावी लागेल असे सांगितले. खांडेकर यांनी त्यावर विश्वास ठेवून गुगल पेद्वारे आठ नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर दरम्यान, वेळोवेळी 64 हजार, 250 रुपये संबंधीत कंपनीच्या प्रतिनिधीकडे पाठविले. मात्र, त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. खांडेकर यांनी याबाबत माहिती घेतली असता, असे कोणत्याही प्रकारचे पैसे भरावे लागत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








