प्रतिनिधी / मिरज
मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील परिचरिकांच्या बदली धोरणा विरोधात महाराष्ट्र शासकीय नर्सेस असोसिएशनच्यावतीने मंगळवारी निदर्शने करण्यात आली. रुग्णालयातील सर्वच परिचरिकांनी या आंदोलनात भाग घेऊन काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला. दरम्यान, परिचरिकांच्या या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम कोणताही परिणाम झाला नसल्याचे असोसिएशनच्या अध्यक्षा प्रतिभा हेटकाळे यांनी सांगितले.
परिचारिका असोसिएशनच्यावतीने अधिष्ठाता सुधीर नणंदकर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. प्रत्येक वर्षी मे महिन्यात शासकीय रुग्णालयातील परिचरिकांची बदली केली जाते. मात्र, यंदाच्या बदल्यांना परिचारिका संघटनेचा विरोध आहे. त्यामुळे बदली आदेश रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.








