तालुक्यातील दहा गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच, अन्य गावात उपपाययोजनांवर भर
प्रतिनिधी/मिरज
शहराप्रमाणे तालुक्याच्या ग्रामीण भागातही आता कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. मालगांव, बेडग, आरग अशा मोठय़ा गावामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. ग्रामस्थांनी याची गांभीर्याने दखल घेऊन मालगांव, बेडगमध्ये स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’ची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
दरम्यान, तालुक्यातील दहा गावांनी मात्र, कोरोनाला वेशीवरच रोखले आहे, अशी माहिती मिरज पंचायत समितीच्या सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे आणि गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी प्रसारमाध्यमांनी दिली.
मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागात लसीकरणावरही भर दिला आहे. ग्रामस्थांनी कोरोना नियमांचे पालन करावे, लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मिरज पंचायत समिती प्रशासनाने केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








