प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्याच्या पूर्व भागात चोरट्यानी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गुंडेवाडी येथील दीपक गुंडू दुरुरे (वय 35) यांचे घर फोडून रोख रक्कम, घड्याळ आणि देवाच्या मूर्ती असा सुमारे साडेसात हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मिरज तालुक्याच्या पूर्व भागात आठवडाभरात ही तिसरी घरफोडी आहे.
यापूर्वी आरग आणि मल्लेवाडी येथे घरफोडी झाली होती. लागोपाठ घरफोडीच्या घटना घडत असल्याने या भागात दरोडेखोरांची टोळी सक्रिय झाल्याची शक्यता आहे. ग्रामीण पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गस्त वाढवून चेरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.








