ऑनलाईन टीम / मिरज
लॉकडाऊनच्या फावल्यावेळेत अनेकजण आपले छंद जोपासण्याचा प्रयत्न करीत आहेत. मिरजेतील युवा कलाकार ललित मिरजकर याने या फावल्यावेळेच्या सदुपयोग करीत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाची सुंदर प्रतिकृती केली आहे. ही प्रतिकृती हुबेहुब झाली असून, नागरिकांतून त्याचे कौतुक होत आहे.
सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वांना घरी बसण्याची वेळ आली आहे. गेली पाच महिने घरात बसून, लोक कंटाळले आहेत. त्याच त्याच गोष्टी करुन त्यांना वैताग आला आहे. मात्र, काही व्यक्ती अशा आहेत की, त्यांनी या लॉकडाउढनमध्ये मिळालेल्या फावल्या वेळेचा चांगला उपयोग करुन घेतला आहे. काहींनी आपले जुने छंद जोपासले आहेत. काही लोक नवनवे प्रयोग करीत आहेत. रोजच्या दैनंदिन धावपळीच्या जीवनामुळे करता न आलेल्या गोष्टी ते आता करीत आहेत.
मिरजेतील युवा कलाकार ललित मिरजकर यानेही याच फावल्यावेळेचा फायदा घेत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाची प्रतिकृती बनविली आहे. सांगली-मिरज रोडवर विजयनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाची नुतन इमारत तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. अत्यंत देखणी अशी इमारत सांगली जिह्याची शान बनली आहे. जिह्यात तयार झालेली ही सर्वात भव्य इमारत आहे. अत्यंत कलात्मकपणे जिल्हाधिकारी कार्यालयाची ही इमारत बांधण्यात आली असल्याने ती पाहण्यासाठी दूरवरुन लोक येत असतात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या इमारतीची प्रतिकृती करण्याचे ललित मिरजकर या तरुणाने लॉकडाउनच्या काळात ठरविले. ललित मिरजकर हा इंटेरियर डिझाईनचा विद्यार्थी आहे. डिजीटल डिझाईनिंगचा त्याचा छोटा व्यवसाय आहे. मात्र, हा व्यवसाय सध्या बंद असल्याने घरात बसून, त्याला जिल्हाधिकारी कार्यालयाची प्रतिकृती करावी, असे सुचले. त्यानुसार त्याने फोम शिटमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची हुबेहुब प्रतिकृती अवघ्या एक महिन्यात तयार केली. ललितने तयार केलेली ही प्रतिकृती अत्यंत देखणी झाली आहे. त्याला मागणी आता होऊ लागली आहे. यापूर्वी त्याने लक्ष्मी मार्केटची हुबेहूब प्रतिकृती बनविली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








