नियमांचा फज्जा, प्रशासनाचे दुर्लक्ष, आदेश आणि कारवाईही कागदावरच
प्रतिनिधी / मिरज
सांगली जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाचा शासकीय यंत्रणांनी धसका घेतला असला तरी बेफिकिर आणि बेजबाबदार नागरिक शासनाच्या सर्व नियमांना धाब्यावर बसवत असल्याने कोरोना संसर्गवाढीला निमंत्रण दिले जात आहे. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असतानाही हा आदेश डावलून मिरज शहर आणि परिसरात विविध बाजार पेठा फुलल्या आहेत.
कोरोना नियमांचा फज्जा उडत आहे. पोलिस प्रशासन आणि महापालिकेकडून कारवाई केली जात नसल्याने नागरिकांची गर्दी अनियंत्रण होताना दिसत आहे.








