स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई, सव्वा लाखांचा मुद्देमाल जफ्त, तिघांना अटक
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहर आणि परिसरात ऑनलाईन जुगाराचे जाळे पसरलेल्या रोलेट-कॅसिनो ऑनलाईन जुगार अड्ड्य़ावर अखेर पोलिसांनी छापेमारी सुरु केली आहे. दोनच दिवसांपूर्वी तरुण भारतने ‘रोलेट-कॅसिनोच्या नावावर जुगाराचा खेळ’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केल्यानंतर या ऑनलाईन जुगाराचा पर्दाफाश झाला होता.
गुरूवारी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आशा टॉकीज जवळील कॅसिनोचा अड्डा उध्वस्त केला. यावेळी एक लाख, 30 हजार, 250 रुपयांचा मुद्देमाल जफ्त करण्यात आला असून, तिघांना अटकही करण्यात आली आहे.








