मध्य रेल्वे विभागाची नागरिकांना नोटीस, 22 तारखेची मुदत
प्रतिनिधी / मिरज
सांगली-मिरज रस्त्यावरील चांदनवाडी येथे रेल्वेच्या जागेवर घरे बांधून राहिलेल्या नागरिकांची अतिक्रमणे काढली जाणार आहेत. तशी नोटीस मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने येथील रहिवाशांना दिली आहे. 22 तारखेपर्यंत घरांची अतिक्रमणे न काढल्यास पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने घरे पडली जातील, असा इशारा नोटीसीतून देण्यात आला आहे.
दरम्यान, रेल्वे विभागाने पाठविलेल्या या नोटीसी विरोधात माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी रेल्वेच्या सहायक मंडळ अभियंत्यांकडे हरकत घेतली आहे. येथील वास्तव्यास असलेल्या नागरिकांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कारवाई करू नये, अशी मागणी केली आहे.








