चार मोटारसायकलीसह पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / मिरज
मिरज, सांगली, कराड आणि तासगाव हद्दीत मोटारसायकली चोरी करणाऱ्या अमोल अशोक घोरपडे (वय 31, रा. शिवाजीनगर, मिरज) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरी केलेल्या मोटरसायकली, मोबाईल असा एक लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोटारसायकली आणि मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस रेकॉर्डवरील चोरट्यांचा शोध घेत होते. अमोल घोरपडे याच्या विविध पोलीस ठाण्यांमधे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो इदगाह माळावर पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.








