अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, दोघांवर गुन्हा
प्रतिनिधी / मिरज
शहर आणि परिसरात प्रतिबंधित गुटख्याची तस्करी वाढली असून, अन्न औषध प्रशासनाने कारवाईची धडक मोहिम हाती घेतली आहे. बुधवारी दोन ठिकाणी छापा टाकून सुमारे दहा हजार रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. अन्न आणि औषध प्रशासन विभागातील अधिकारी रमाकांत लहू मगदूम (वय 55) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली आहे.
स्टेशन रोडवरील सुखनिवस हॉटेल समोर आणि वंटमुरे जवळ छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. जलील पिरसाहेब शेख (वय 5, रा. म्हाडा कॉलनी) आणि फारुक शौकत बावा (वय 37, रा. मगदूम गल्ली, एमएचबीसी ऑफिस पाठीमागे) या दोघांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








