24 तासात चोरटा गजाआड, 11 ताळे दागिने हस्तगत
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील सांगलीकर मळा, श्रीनगर कानडे कॉलनी येथे राहणाऱ्या डॉ. नितीन विश्वास चिकुर्डेकर (वय 35) यांचा बंगला त्यांच्याच कामगाराने फोडून सुमारे चार लाख रुपयांचे 11 ताळे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करुन केवळ 24 तासात चोरट्याला गजाआड केले.
कृष्णाजी नामदेव कालगुंडे (वय 28, रा. अर्बन बँक कॉलनी, सुभाषनगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नांव आहे. त्याच्याकडे चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. चोरटा हा शासकीय नोकरदार असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.