महात्मा गांधी चौकी पोलिसांकडून 24 तासात गुह्याचा छडा
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहरातील एसटी स्टँडजवळ प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारुन लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्याला महात्मा गांधी चौकी पोलिसांनी 24 तासात गजाआड केले. रजा पिरा शेख (वय 32, रा. ख्वॉजा वस्ती, झोपडपट्टी, सध्या रा. जुना हरिपूर रोड, नुरानी मस्जिद पाठीमागे, मिरज ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 55 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन हस्तगत केली आहे. अवघ्या 24 तासात महात्मा गांधी चौकी पोलिसांनी या गुह्याचा उलगडा केला आहे .
सोमवारी रात्री शहरात एसटी स्थानक परिसर आणि शिवाजीनगर येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या. अटक करण्यात आलेला राजू शेख या आरोपीने स्टँड रोडवर प्रवाशाची चेन लंपास केली होती. शिवाजीनगरमध्ये चेन स्नॅचिंग करणारा चोरटा पसार झाला आहे. पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.








