जिल्हा पोलिस प्रमुखांची कारवाई
प्रतिनिधी / मिरज
खुनाचा प्रयत्न, हत्यारे घेऊन दहशत माजविणे, दुखापत करणे आणि खंडणी मागणे अपहरण करणे अशी अने गुन्ह्यांची मालिका रचणाऱ्या शहरातील सलीम पठाण टोळीला सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. बुधवारी जिल्हा पोलिस प्रमुखांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्यांना आळा बसणार आहे.
तडीपारीची कारवाई झालेल्यांमध्ये टोळीचा म्होरक्या सलीम गौस पठाण (वय 31), प्रथमेश सुरेश ढेरे (वय 20, दोघे रा. मंगळवार पेठ), गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटगी (वय 31), चेतन सुरेश कलगुटगी (वय 34, दोघे रा. वडर गल्ली) आणि अनिस शब्बीर शेख (वय 25, रा. ख्वाजा वसाहत, झोपडपट्टी) या पाच जणांचा समावेश आहे. या टोळीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होते. त्यामुळे या टोळी विरुद्ध तडीपारीची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलिसानी दिला होता. गुरुवारी जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांनी त्यास मंजुरी देऊन सलीम पठाण टोळीला तीन जिल्ह्यातून एक वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले.








