हातनूर / वार्ताहर
कोरोनाशी लढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आखलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाला हातनूर येथे प्रचंड उत्साहात सुरवात झाली. संपूर्ण जगामध्ये भारत कोरोना रुग्णांच्या संदर्भामध्ये दोन नंबरला एकट्या महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी जगामध्ये महाराष्ट्र चार नंबरला रूग्ण संख्येच्या बाबतीत असल्यामूळे तसेच महाराष्ट्रातील मृतांची संख्या लक्षात घेतात जागतिक स्तरावर नववा क्रमांक असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने महत्त्वाकांक्षी माझे कुटुंब माझे जबाबदारी हे अभियान सुरू केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशात शिक्षकांचा उल्लेख नसला तरी सांगली जिल्हा परिषदेने सांगली जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदर लक्षात घेता कोरोना पूर्ण आटोक्यात आणण्यासाठी व वेळीच कोरोनाचे रुग्ण लक्षात येऊन त्यांच्यावर खबरदारी व योग्य ती उपाययोजना तसेच उपचार व्हावेत यासाठी प्रत्येक गावांमध्ये आरोग्य पथकाची नेमणूक केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत या पथकांना प्रशिक्षण देण्यात येऊन त्यांना टेंपरेचर गन तसेच ऑक्सिजन मीटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मास्क सॅनिटायझर व हॅन्ड ग्लोव्हज वापरून या पथकाला दररोज पन्नास कुटुंबांचे सर्वेक्षण करायचे असून त्यामधून उपलब्ध झालेली माहिती ऑनलाईन ॲपद्वारे भरावयाची आहे. हातनुरमध्ये या पथकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर शेळके व डॉक्टर विक्रम पाटील यांनी प्रशिक्षण दिले.
हातनुरमध्ये या अभियानाला सुरुवात करून त्यांच्या टीम पाडण्यात आल्या या टीमना नवनियुक्त सरपंच वालूताई विलास कोळी यांनी मार्गदर्शन केले. प्रतिनिधिक स्वरूपात गावचे प्रथम नागरिक म्हणून अमोल विलास कोळी यांचे पथकातील सदस्य टेम्परेचर व ऑक्सिजन मीटरने शशिकांत पाटील व रेखा माने – गायकवाड यांनी तपासणी केली व अभियानाला सुरुवात करण्यात आली.
हातनूरमध्ये कोरोना रुग्ण नसून यापुढेही हातनूरमध्ये कोरोना शिरकाव करणार नाही अशा प्रकारचे काम शशिकांत पाटील यांचे नेतृत्वाखाली सर्व टीमने करावे असे आवाहन सरपंच वालूताई विलास कोळी यांनी केले. यावेळी पथकातील सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








