महापालिका क्षेत्रात 114 रूग्ण वाढलेः शेवाळे गल्लीत सहा रूग्ण पॉझिटिव्हः रोहिदास नगरमध्ये आठ जण पॉझिटिव्हः ग्रामीण भागात 51 रूग्ण वाढले
प्रतिनिधी/सांगली
बुधवारी जिल्हय़ात नवीन 165 रूग्ण वाढले आहेत. तर 42 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण रूग्णसंख्या 2063 झाली आहे. महापालिका क्षेत्रात 65 रूग्ण वाढले आहेत. सांगलीचे माजी महापौर हारूण शिकलगार यांच्यासह चौघांचे कोरोनाचे उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत. त्यामुळे कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या आता 68 झाली आहे.
सांगली-मिरजेत 114 रूग्ण वाढले
सांगली-मिरजेत कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. सांगली आणि मिरजेत मोठयाप्रमाणात रॅपीड ऍण्टीजन टेस्ट घेण्यात येत आहे या टेस्टमध्ये रूग्णसंख्या वाढत चालली आहे. सांगली शहरात 22 तर मिरज शहरात 15 असे एकूण 37 रूग्ण आढळून आले आहेत. सांगली शहरातील खणभागमधील शेवाळे गल्ली येथे हा कॅम्प घेण्यात आला. त्यामध्ये या गल्लीतील तब्बल सहा जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर जामवाडी परिसरातील तीनजण साखरकारखाना परिसरातील पाच जण आणि शामरावनगर येथील विविध भागात सहा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या टेस्टमध्ये मिरजेतील 15 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ऋााrल इसापुरे गल्ली, वेताळबा नगर, मोमीन गल्ली, खोत नगर गल्लीतील रूग्णांचा समावेश आहे.
तर थेट स्वॅब घेवून पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये एकूण 71 रूग्ण आहेत. त्यात सांगली शहरात 63 तर मिरज शहरात पाच आणि कुपवाड येथील तीनजणांचा समावेश आहे. यातील पाच ते सहा अहवाल हे खासगी प्रयोगशाळेत तपासले आहेत. सांगली शहरातील विविध उपनगरातील हे 63 लोक असून त्या सर्व ठिकाणी तातडीने कंटेन्मेंट झोन करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातही रूग्ण वाढू लागले
सांगली-मिरज शहराबरोबरच जिल्हय़ातील ग्रामीण भागातही मोठय़ाप्रमाणात रूग्ण वाढत चालले आहेत. ग्रामीण भागात एकूण 51 नवे रूग्ण वाढले आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यात एकूण दोन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये गवळेवाडी आणि कांदे येथे प्रत्येकी एक रूग्ण आहे. वाळवा तालुक्यातील आष्टा येथील दोन रूग्ण आणि इस्लामपूर शहरात एक रूग्ण वाढला आहे. तासगाव तालुक्यात एकूण 14 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये तासगाव शहरात सात रूग्ण आणि नागाव येथे एक रूग्ण वाढला आहे. तर कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर कवठेमहांकाळ शहरात दोघेजण पॉझिटिव्ह आहेत. आटपाडी तालुक्यात सहा रूग्ण वाढले आहेत. जत तालुक्यात चार रूग्ण वाढले आहेत. तर मिरज तालुक्यात 12 रूग्ण वाढले आहेत. तर पलूस तालुक्यात एक रूग्ण वाढला आहे.
उपचारादरम्यान माजी महापौर हारूण शिकलगार यांच्यासह चौघांचा मृत्यू
सांगली महापालिकेचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक हारूण शिकलगार यांचा कोरोनाने उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. त्यांना मंगळवारी दुपारी अचानक धाप लागल्याने त्यांना तातडीने मिरजेच्या वॉनलेस हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आला होता. श्वसनाचा त्यांना आधीपासूनच त्रास होता. त्यांची कोरोनाची चाचणी घेतल्यावर ती पॉझिटिव्ह आली. बुधवारी सांयकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कडेगाव येथील 50 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सांगली शहरातील खणभाग येथील 70 वर्षीय महिलेचा कोरोनाचे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर गावभागातील 55 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. असे बुधवारी चौघांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे जिल्हय़ात एकूण 68 बळी गेले आहेत.
42 जण कोरोनामुक्त
जिल्हय़ातील बुधवारी उपचार सुरू असणारे 42 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना दवाखान्यातून डिस्चार्च देण्यात आला आहे. त्यांना आता होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर उपचार सुरू असणाऱया 21 जणांच्यावर मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 2063
बरे झालेले 952
उपचारात 1043
मयत 68