प्रतिनिधी / सांगली :
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून थेट कर्ज, २० टक्के बीजभांडवल कर्ज योजना व व्याज परतावा कर्ज योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक हणमंत बिरादार यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडून थेट कर्ज योजनेत संपूर्ण कर्ज महामंडळाचे राहील यासाठी २० टक्के बीज भांडवल योजनेत ७५ टक्के कर्जबॅकेचे, २० टक्के कर्ज महामंडळाचे व ५ टक्के लाभार्थीचा सहभाग असणार आहे. व्याज परतावा योजनेत संपूर्ण कर्ज बँकेचे राहील व लाभार्थीन कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास कमाल १२ टक्केपर्यंतचे व्याज महामंडळ लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करणार आहे.
थेट कर्ज योजना आणि २० टक्के बीजभांडवल योजना ऑफलाईन आहे.या योजनेअंतर्गत कर्ज मागणी अर्ज मिळण्यासाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा. व्याज परतावा योजना ऑनलाईन स्वरूपाची या योजनेचा लाभ घेण्यासाठी www.msobcfdc.org या वेबसाईटवर जाऊन “व्याज परतावा योजना’ हा पर्याय निवडावा व अर्जसोबत संबंधित कागदपत्रे पोर्टलवर सादर करावीत. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड,संभाजीनगर,सांगली येथे ०२३३-२३२१५१३ या क्रमांकावर संपर्क करावा तसेच महामंडळाची वेबसाईटwww.msobcfdc.org पाहावी असेही त्यांनी कळविले आहे.








