प्रतिनिधी / सांगली
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियात याची माहिती दिली असून आपल्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.
महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच आहे. विशेष करून सांगली शहरात मोठ्या संख्येने कोरोणाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात आणि जिल्ह्यातही चौथ्या स्तराचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अविरत प्रयत्न करत आहे.
महापौर सूर्यवंशी यांनी दोन दिवसापूर्वी कोरोना चाचणी करून घेतली होती. सध्या यांची प्रकृती चांगली असून ते गृह विलगीकरनात आहेत. आपली प्रकृती चांगली असून काळजी करण्याचे कारण नाही. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








