प्रतिनिधी / सांगली
कोरोनाच्या महामारीत महापालिकेला जमियत उलेमा ए हिंद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शववाहिका आणि रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली आहे.
सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे रुग्णवाहिका आणि शवहिकेच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी जमियत उलेमा हिंदचे जिल्हा कार्याध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सुफियांन पठाण यांनी जमियत उलेमा ए हिंद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने करण्यात येत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी मनपा उपायुक्त स्मृती पाटील यांची भाषणे झाली त्यांनी हा सेवाभावी देणगीचे कौतुक केले.
यावेळी नगरसेवक फिरोजभाई पठाण माजी नगरसेवक आयुब बारगीर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन जमियत उलेमा ए हिंदचे जिल्हा कार्याध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि मदनी ट्रस्टचे महासचिव सुफीयांन पठाण यांनी केले. कार्यक्रमाला इस्लामपूरचे राजूभाई मोमीन, मौलाना कलिंम मुल्ला, जब्बार बारस्कर, हाफिज रौफ, हाजी तौसिफ कडलासकर, हाफिज सोहेल, मौलाना तौसिफ, इकबाल महात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Articleबिहार विधानसभा निवडणुकीसाठी 30 हजार CRPF जवान
Next Article मित्राच्या खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेप








