प्रतिनिधी / सांगली
सांगली महापालिका क्षेत्रात शनिवारी सायंकाळपर्यंत 78 नवे पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामध्ये सांगली शहरात 62 मिरज शहरात 13 कुपवाड मध्ये 3 रुग्ण वाढले आहेत.
आज महापालिका क्षेत्रात आढळलेले रुग्ण मिरज वंटमुरे कॉर्नर, अमननगर, खतीबनगर, पंढरपूर रोड, सांगली गणेश नगर, कोल्हापूर रोड पवार प्लॉट, रुक्मिणी नगर, वखारभाग , हडको कॉलनी, पत्रकार नगर, हसनी आश्रमजवळ, सूर्यवंशी प्लॉट, संजयनगर, खनभाग, , विश्रामबाग, मिरज जीएमसी हॉस्टेल, विजयनगर, कोल्हापूर रोड, मंगलमूर्ती कॉलनी, कुपवाड रामकृष्णनगर , चांदणी चौक, आमराई रोड, सांगली वाडी, गावभाग आदी भागातील रुग्णांचा समावेश आहे. आज आर्टिपीसीआरकडून 78 नव्या रुग्णाची माहिती कळवण्यात आली आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत मनपाक्षेत्रात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 78 वर पोहचली आहे.
Previous Articleकोल्हापुरात कोरोनाचे 3 बळी, 118 पॉझिटिव्ह
Next Article सांगली : खानापूर तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी









