सर्व पक्षीय कृती समितीची नगरविकास विभागाकडे मागणी
प्रतिनिधी / सांगली
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या विज बिल भरणा प्रक्रियेधे १,२९,००,००० रूपये इतके गैरव्यवहार झाल्याचा गुन्हा महानगरपालिकेच्यावतीने नोंदवण्यात आला आहे. महानगरपालिका लेखाविभाग, विज अभियंता महानगरपालिका व विज वितरण कंपनीचे कर्मचारी व आधिकारी यांच्या संगनमताशिवाय असा गैरव्यवहार होणे शक्य नाही.
त्यामुळे या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी सर्व पक्षीय कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन नागर विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात आले आहे.








