प्रतिनिधी / सांगली
सा मी कु महानगरपालिका क्षेत्रात खुल्या भूखंडाचा बाजार सुरू असून त्या बाबत नागरिक जागृती मंच व नगरसेवक संतोष पाटील पाठपुरावा करत आहेत. या मागणीची आयुक्त नितीन कापडणीस यांनी दखल घेत निवृत्त तहसीलदार यांची नेमणूक केली असून मनपा मालमत्ता नोंदणी अधिकारी म्हणून मिरजेचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार शेखर परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परब हे महसूल खात्यात अडतीस वर्षे नोकरी केल्यानंतर 2017 रोजी मिरज येथून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी मिरज उपविभागीय कार्यालय येथे शिरस्तेदार इस्लामपूर येथे नायब तहसीलदार हवेली जिल्हा पुणे येथे नायब तहसीलदार मिरज येथे नायब तहसीलदार व प्रभारी तहसीलदार असे काम केले आहे. शासनाने तीन वेळा उत्कृष्ट कामाबद्दल गौरविले आहे. शेखर परब हे दिनांक 25 ऑगस्ट 2021 रोजी महानगरपालिकेमध्ये मालमत्ता नोंदणी अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत.








