प्रतिनिधी / इस्लामपूर
एकरकमी एफआरपी मागणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलानांची खिल्ली उडवणाऱ्या कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष मदन मोहिते यांना डॉ. सुरेश भोसले यांनी आवर घालवा, अन्यथा वाळवा तालुक्यात फिरु देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी दिला.
रेठरे हरणाक्ष येथील कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूकीची सहकार पॅनेलची सभा झाली. यामध्ये बोलताना माजी अध्यक्ष मदन मोहिते यांनी एकरकमी एफआरपी मागणे चुकीचे आहे. शेतकरी संघटनेचे आदोलन एकरकमी एफआरपी केलेल्या आंदोलन चुकीचे आहे. पूर्वी पहिले, दुसरे, तिसरे, व फायनल असे बील मिळाले पाहिजे. त्यामुळे साखर कारखान्याला व्याजाचा भुर्दंड भरावा लागतो. असे वक्तव्य त्यांनी केले. याउलट एफआरपीचे तुकडे झाल्याने एकरकमी कर्जाची परतफेड होत नाही, पर्यायाने उस उत्पादक शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याजाने कर्ज मिळत नाही. शेतकऱ्यांचा तोटा होतो. याचा मोहिते यांनी अभ्यास करावा.
राजू शेट्टी यांनी या निवडणुकीत कोणत्याच पॅनेलला समर्थन दिलेले नव्हते.कार्यकर्त्यांना आपल्या स्थानिक पातळीवरील निर्णय घ्यावा, असे सुचित केले होते. असे असताना कृष्णाचे माजी अध्यक्ष मदन मोहिते यांनी थेट स्वाभिमानीच्या एकरकमी आंदोलानाची खिल्ली उडवली. मोहिते यांचे वय ७५ आसपास आहे. साठी बुध्दी नाटी अशी त्यांची अवस्था झाली आहे, त्यांनी आता घरात बसावे, असा टोला जाधव यांनी लगवला.
Previous Articleअतिदुर्मिळ रक्तगटाच्या पंकजने वाचविले महिलेचे प्राण
Next Article ‘अलमट्टी’च्या विसर्गाबाबत कर्नाटकशी समन्वय








