प्रतिनिधी / भिलवडी :
पुणेपदविधर मतदारसंघाच्या मतदाना निमीत्त पलुस तालुक्यातील भिलवडी येथील मतदान केंद्रावर भर उन्हात पध्दवीधर मतदारराजा उभारलेचे पाहुन कृषीराज्य मंत्री डॉ. विश्वजीत कदम संतापले.
भिलवडी व अंकलखोप दोन्ही जि. प. गटामध्ये एकच मतदान केंद्र भिलवडी येथे असून ३९४० मतदान आहे. दुपारी ३ च्या सुमारास मंत्री डॉ. कदम यांनी मतदान केंद्रास भेट दिल्यानंतर मतदारराजा भर उन्हात मतदानासाठी मोठ्यारांगा उभा रहिलेले पाहुन डॉ. कदम संतापले मतदारांच्यासाठी सावलीची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. तर एका मतदारास मतदान करण्यास किमान दिड तास वेळ लागत असल्याने मंत्री कदम यांनी जलसंपदामंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री जयंत पाटील जिल्हा अधिकारी अभिजित चौधरी यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून माहिती दिली व यंत्रणा सक्षम राबली नाही तर मतदानाचा टक्का घटेल अशी शक्यता वर्तवली.








